शशांक Profile picture
Aug 18, 2018 26 tweets 7 min read Twitter logo Read on Twitter
आज थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या जयंतीनिमित्त जरा इतिहास!

पेशवे म्हणजे श्रीवर्धनचे भट मग त्यांचा मराठा राज्यातले एक थोर लढवय्ये,शुर सेनानी आणि मुत्सुद्दी राजकारणी असा गौरव का होतो?
कसा झाला शिवाजी महाराज ते पेशव्यांपर्यत इतिहासाचा प्रवास ह्या ट्विटमालिकेतुन..

#मराठी @MarathiRT
तर सुरूवात करूयात शिवाजी महाराजांपासुन! भोसलेकुळात जन्मलेले शिवाजीराजांनी १६४६ साली पहिला किल्ला जिंकून आपल अस्तित्व स्थापित केल. तेव्हापासुन १६७४ मराठी साम्राज्याचे छत्रपतीपद मिळेपर्यतच पर्यतचा २४० किल्ले, सैन्य अन् दौलतीचा प्रवास आपल्याला ठावूक आहेच. 🙏
शिवरायांनंतर त्याच्या सहा मुली आणि वंश व मराठी गादी चालवायला अनुक्रमे सन १६५७ व १६७० मध्ये जन्मलेले संभाजीराजे व राजारामराजे ही दोन मुल.
शिवरायांच्या १६८० मध्ये देहवसन झाल्यानंतर बहुत अतंर्गत राजकारणानंतर १६८१ मध्ये शुरवीर संभाजीराजे मराठी साम्राज्याचे छत्रपती झालेत.
शालक गनोजी शिर्क्यांच्या फितरूमुळे मुघलांच्या हाती लागलेल्या संभाजी महाराजांना औरंग्याने हालाहल करत १६८९ मध्ये मारले. संभाजी महाराजांचे चिरंजीव, शाहु राजे. जन्म १६८२! ज्यांना, मातोश्रीसमवेत मुघलांनी कैद केले व आपल्याजवळ बंदी म्हणून ठेवले.
आता संभाजीराजांच्या मृत्यूनंतर शिवरायाचे दुसरे मुल, १६९० मध्ये राजारामराजे मुघलांपासुन रायगडाच्या वेढ्यातुन सुटून आजच्या तामिळनाडूतल्या जिंजीला प्रस्थान केले. आणि तिथूनच त्यांनी मराठी साम्राज्याचा कारभार चालू केला.
त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई, दुसऱ्या पत्नी राजसबाई १६९४...
मध्ये जिंजीला आल्यात! राजाराम राज्यांना १६९६ मध्ये राजे शिवाजी (द्वितीय) नामक पुत्रप्राप्ती झाली.

महाराणी ताराबाई ह्या हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या म्हणजे शुरता ही रक्तातच. १७०० साली जवळजवळ सात वर्षे जिॅजी लढल्यानंतर मुघलांनी तो ताब्यात घेतला. राजारामांनी तिथून वाचून...
सिंहगडजवळ केला. सिंहगडावरच त्याचे १७०३ साली देहवसन झाले.
आता मुघलांनी ताराबाई व राजारामांच्या इतर कुटूंबकाबिल्याला कैद केले पण काही काळाने लगेच सोडून दिले.
राजारामराज्यांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सुत्रे महाराणी ताराबाईंनी आपल्या हातात घेतली.
संतोजी, धनाजी, उदाजी चव्हाण , चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे व महान पेशवे बाळाजी विश्वनाथ ह्याच्या सोबतीत त्यांनी मराठी साम्राज्याची विस्कटलेली घडी परत बसवत मुघलांना पळती भुई थोडी केली.
राजारामांच्या (१७०३) मृत्यूनंतर ताराबाईंनी आपले चिरंजीव शिवाजी (द्वि.) ह्यांना गादीवर बसवले..
आता इकडे, १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, त्याच्या मुलाने मराठ्यांमध्ये अंतर्गत वाद होण्यासाठी संभाजीराजांचे चिरंजीव शाहू महाराजांची सुटका केली. (इस. १७०८)
आता संभाजी महाराजांचे पुत्र म्हणून अनेक सरदारही शाहू राजाच्या पाठीशी उभे राहिलेत व सुरू झाली वारसहक्काची लढाई...
हळूहळू ताराबाईंच्या मंत्रिमंडळात फुट पडत एक एक मंत्री शाहू महाराजांनी येऊन मिळालेत. पुढे आमात्य रामचंद्रपंतांना ताराबाई व शिवाजी राजांच्या हाताखालचे राज्य सुरक्षित वाटेना म्हणून त्यांनी सत्तांतर घडवून आणत सर्व कोल्हापुरने जिंकलेल किल्ले, साम्राज्य आपसुक शाहु महाराजांना देऊ केलेत.
पुढे पेशवे बाळाजी विश्वनाथांनी महत्त्वाचे सेनानीही शाहूमहाराजांकडे वळते केलेत. व ताराराणींचे राज्य आता फारच कमकुवत बनले. राजारामराज्यांची दुसरी पत्नी राजसबाईंनी "बाहेरून मदत" घेत राजमहालात दगाफटका करत ताराराणी व शिवाजी राज्यांना कैद केले. कैदेतच शिवाजी राज्यांचा मृत्यू. (१७१६)
ह्या शिवाजी राजांना एक मुलगा म्हणजे ताराबाईंचा नातु राजाराम ह्यास शाहु महाराजांनी दत्तक घेतले.

राजसबाईंनी आपला मुलगा संभाजी ह्यास ताराबाईंना अटक घडवूुन सत्तवर बसवल. पुढे १७३१ मध्ये वारणा तहानंतर कोल्हापुर व सातारा अश्या दोन गाद्या मध्ये मराठा साम्राज्याची विभागणी झाली....
कोल्हापुरच्या गादीवर बसलेल्या संभाजी महाराजांना पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी शिवाजी (III)ह्यांना दत्तक घेतल. व त्यांनी गादी पुढे चालवली.

आता परत जाऊयात, बाळाजी विश्वनाथांकडे, मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान! (१७००-०७)
श्रीवर्धनचे देशमुख!
पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मत्सुद्दी तर होतेच पण सेनानी ही होते. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर त्याच्या देशमुखीवर हाबश्या सिद्दी डोईजड होऊ लागताच ते आमत्य रामचंद्रपंत ह्याच्या सेवेत.
त्यामुळे मुघलांशी १७०७ पर्यत ताराबाईंच्या हाताखाली वाटाघाटी करत,धनाजी घोरपडेच्या खाली लढाईत भाग घेत.
पुढे शाहुमहाराजांची सुटका होताच, जेव्हा ताराबाईंशी ते समजुतदारपणे वाटाघाटी करावायास गेले पण त्या फिस्कटल्या. आणि जेव्हा ताराबाईंनी संतोंजी घोरपड्यांना शाहू महाराजांवर चालून जाण्यास सांगितले तेव्हा थोरल्या राजांविरोधात न जाण्याच सल्ला देणारे बाळाजी विश्वनाथ.
पुढे स्वत: व संताजी तसेच इतर अनेक सेनानी त्यांनी शाहु महाराजांकडे वळते केलेत. पुढे १७०८ मध्ये शाहु महाराजांना राज्याभिषेक झाल्यावर सातारच्या गादीचे आमात्य, बाळाजी विश्वनाथ बनलेत. दैव बलवत्तर आणि शाहु महाराजांशी निष्ठा म्हणून फासे बरोबर पडत गेलेत व १७१३ मध्ये पेशवे पदावर बढती...
पण बाळाजी विश्वनाथांचा एकूनच इतिहास बघता साम, दाम, दंड, भेद अशी खेळी करत बरोबर एक प्रांत जिंकून, चौथाई वसुल करत ते शाहु महाराजांचे उजवे बनलेत. नाशिक, खान्देश, गुजरात पर्यतचा मुघलांचा भाग, इकडे हाबश्यांकडून समुद्री किल्लेही पदरात पाडून घेत शाहु महाराजांचे वर्चस्व बहुत वाढवले...
बाप असा तर बेटा अजून बिलंदर. भटांच्या घरात जन्माला येऊन देखील थोरले बाजीराव म्हणजे एक रांगडा, शिपाईगडी म्हणून नावाजलेले. १९२० मध्ये जवळजवळ ४० वर्षे सामाज्र्यांसाठी दगदग करून बाळाजी विश्वनाथांनी देह टेकला. शाहु महाराजांचा लहान वयात इतक्या मर्दुमकी गाजवणाऱ्या बाजीराववर विशेष जीव!..
बाळाजी विश्वनाथांना दोन मुल, बाजीराव व चिमाजी अप्पा! बाजीरावांच्या धाडसाबद्दल शप्द कमी पडावेत इतक्या लढाया त्यांनी गाजवल्या. मराठे खुल्या मैदानातही लढू शकतात हा विश्वास थोरल्या बाजीरावांमुळेच पसरला. पुण्यात शनिवारवाडा बांधणारे हेच! सातारच्या थोरल्या गादीशी निष्ठा आणि लढाया हेच ..
थोरल्या बाजीरावांचे ४० वर्षांचे आयुष्य! चिमाजी अप्पांनी ही कोकण गाजवला. पण बाजीरावांच्या मानाने ते संयंमी व वडिलांसारखे मुत्सुद्दी! ह्या दोन भावंडांच्या शौर्याच्या गाथा गाव्या तेवढ्या कमीच.

थोरल्या बाजीरावांना काशीबाईंपासुन तीन मुल राघुनाथराव, जनार्दन व नानासाहेब(जन्म १९२१)!
पुढे नानासाहेबांकडे शाहुमहाराजांनी पेशवे पदाची वस्त्र १७४० मध्ये दिलीत. शिवरायांनंतर नानासाहेबांनींच काय ते पुण वसवल.ते आजतागायत टिकून आहेत. अतिशय जबाबदार पेशवे व कुशल सेनानी म्हणून नानाजलेल्या नानासाहेबांनी अटकेपार झेंडे लावलेत. पुढे १७४९ मध्ये शाहु महाराजांच्या मृत्यू झाला.
जेवढे कुशल सेनानी तेवढी मुत्सुद्दी राजकारणी म्हणून शाहू महाराजांचे दत्तकपुत्र व ताराबाईंचे नातु राजाराम ह्यांना राजगादीचे अधिकार न देता नानासाहेबांनी ते अधिकार स्वत:कडे ठेवलेेत. पुढे राजारामांशी करार करून तेच मराठा साम्राज्याचे सत्ताधीश बनलेत. फक्त कारभार गादीचे नावे चालवला.
इकडे थोरल्या बाजीरावांचे थोरले चिरंजीव रघुनाथ म्हणजेच राघोबादादा ही वडिलांप्रमाणेच मैदान गाजवू लागलेतय त्यांनीच अटक, पेशावर पर्यत मराठी साम्राज्य पसरवल. राघोबादादांना सोबत सदाशिवराभाऊंची (चिमाजीअप्पांचे चिरंजीव) दोघांनी मिळून मराठा साम्राज्य जगप्रसिद्ध केल.
पुढे पानिपत झाल अन् मग मराठा साम्राज्याची एक उलटी गणतीच सुरू झाली. लढाईत नानासाहेबांचे १८ वर्षीय चिरंजीव विश्वासराव, स्वत: सदाशिवराव भाऊ ह्यात कामी आलेत. पराभवाने हाय खाऊन नानासाहेब पेशवे ही वारलेत.(१७६१)
पुढे १७६१ मध्ये नानासाहेबांचे धाकटे चिरंजीव थोर माधवराव ह्यांना पद दिले.
थोरले माधवराव पेशवे हे देखिल अगदी थोरल्या बाजीरावांप्रमाणेच! शिस्त, शौर्य, चिकाटी हे गुण त्यांच्यात. अनेक लढाया त्यांनीही जिंकल्यात.

माधवराव पेशव्यांनतर मात्र पेशवाईला जशी साडेसातीच लागली, मराठा साम्राज्याची धुरा सांभाळणाऱ्या ह्या ब्राम्हण घराण्याची सांगताच झाली.🙏
#म #मराठी
@threadreaderapp please unroll.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with शशांक

शशांक Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(