आपलं संविधान आपला सन्मान !
भारतीय संविधान चिरायू होवो !
भारतात हजारो जाती अन विविध धर्म आहेत.त्या सर्वांच्या मुलभूत हक्कांचे संरक्षण संविधान करते.म्हणून आपण उघड बोलू शकतो.
आपले मत मांडू शकतो.नापसंती व्यक्त करतो.मुक्तपणे सार्वजनिक ठिकाणी वावरू शकतो. 👇
तुम्ही हिंदू असा,मुस्लीम असा,शिख असा बौद्ध असा ख्रिस्ती असा लिंगायत जैन पारशी आदिवासी असा.या सर्वच जाती धर्मातील स्त्री पुरुषांना नोकरी देणे त्यांचे हक्क अधिकार देणे सुट्या देणे बोनस देणे शिक्षण स्त्रियांना मताचा 👇
तुमचा विकास करण्यासाठी काही तरतूद करायची की नाही?
तुम्हाला आरक्षण मिळणार की नाही?
हे दुसऱ्या कुणी ठरवले असते.
तसे ते काही लोक ठरवण्याचा प्रयत्न करतच आले आहेत.👇
यासाठी तुम्हाला जर तुमच्या हक्क अधिकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कवच जपायचे असेल तर तुम्हाला संविधान जपावे लागेल.त्यासाठी सर्वांनी सोबत येवून आवाज उठवला पाहिजे. 👇
जात-धर्म-पंथ विसरून एकत्रिपणे एका सुरात एका आवाजात जन गण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता म्हणले पाहिजे.संविधान हा तुमच्या स्वातंत्र्याचा दस्तावेज आहे कुणा एका जात समुहाचा नाही. 👇